बुधवार, १० डिसेंबर, २०१४



बरेच दिवस झाले , नवीन काही लिहिले गेले नाही माझ्याकडून .
अनेक मसुदे अर्धवट राहिले आहेत . अभ्यास , मराठीत टाईप करण्यासाठी लागणारा वेळ , त्यासाठी चांगल्या गतीचे इंटरनेट …

कारणे नेहेमीप्रमाणेच अनेक …

आता आलास झटकून काहीतरी लिहिलेच पाहिजे

रामदासांनी म्हटले आहेच :

दिसामाजी काहीतरी ते लिहावे
प्रसंगी अखंडित वाचीत जावे
अभ्यासे प्रकट व्हावे
नाही तरी झाकोनी असावे
नेमकचि बोलावे
तत्काळची प्रतिवचन द्यावे

- Sam

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

दीपावली : एक मुक्त चिंतन

शुभ दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा !

असाच थोडा विचार करत बसले होते अन् विचारांची मुक्त उधळण सुरु झाली मनात . थोडीशी विस्कळीत थोडीशी आठवणीनी ओथंबलेली . आणि मग उतरवली अनुदिनीवरल्या ह्या कागदावर … 

दिवाळी दिवाळी म्हणजे नेमकं काय ?

सध्यापुरता विचार केला तर गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून माझ्यासाठी हा एक सुटी असलेला दिवस ह्याशिवाय तरी काही वेगळे महत्व नाही या दिवसाचं !

आजोबा असताना मी शाळेत असल्यामुळे मोठी सुटी मिळे आणि पूर्ण दोन आठवडे ठाण्याला जाऊन राहता येई .आजी आणि दोन्ही दादांबरोबर रांगोळी काढणे,  किल्ले बघायला जाणे अन भर दुपारी उन्हात मनसोक्त खेळणे असे ते सुंदर दिवस होते . याहीपेक्षा आजोबांसोबत दिवाळीच्या सुटीतला अभ्यास करायला मिळायचा. खूप मजा यायची या सुटीच्या दिवसांत . कितीतरी नवीन पद्धती , गणितातील गमती - जमती , लिखाणाचा सराव , मुद्रितशोधानात त्यांना केलेली मदत अन् दिवाळीच्या वहीसाठी लढवलेली कल्पकता हीच खरी  दिवाळी असायची माझ्यासाठी.केवढा शिकायला मिळलय तेव्हा आजोबांकडून ! दिवाळीची वही सजवताना , अगदी एक साधा कागद वहीत कमीत कमी गोंद वापरून कसा नीट चिकटवायचा इथपासून ते अगदी डोळ्यासमोर उभे राहील असे प्रवासवर्णन सोप्या शब्दात कसे लिहायचे किवा पत्र कसे लिहायचे हे सारे नकळत शिकायला मिळाले आजोबांकडून ह्या जेमतेम ५-६ दिवाळीच्या सुट्यांमध्ये . अशाच बहुदा त्यांच्या शेवटच्या दिवाळीत आयडियलकडे मागवून घेतलेली अन मला काही पूर्वकल्पना न देता माधुरी पुरंदरे ह्यांची "वाचू आनंदे " हे पुस्तकांची मालिका  वाढदिवस आणि दिवाळी भेट म्हणून त्यांनी घेतली होती . ती आजवरची मला मिळालेली सगळ्यात मौल्यवान अन खूप काही शिकवुन गेलेली अशी विशेष दिवाळी भेट ठरली. 
नावापुरते आणि आमची हौस भागवायला २-४ अनार ,  एखादे भुईचक्र आणि फुलबाज्यांचा एक खोका हे आणि एव्हढेच फटाके घाबरत घाबरत आई - बाबा , आजी - आजोबा,  मावशी - काका आणि दोन्ही दादांसोबत अंगणात फोडायचो . कसं कोण जाणे पण फटक्यांमुळे प्रदूषण होते इ  गोष्टी मला त्या लहान वयातही समजत होत्या . केपा आणि त्यांच्या बंदुका घेऊन मात्र आम्ही बरेच दिवस वेगवेगळे चोर शिपाई आणि इतर मारामारीचे खेळ वाडाभर उंडारत खेळत असू . आजोबा गेले अन् त्यावर्षी फटाके आणण्याचे थांबवले ते थांबवलेच . नंतरही कधीतरी आईने एकदोन फुलबाज्या आणल्या होत्या ; पण ती मजा नसल्यामुळे इच्छाच झाली नाही फटके फोडायची . पणत्या आणून त्या रंगवणे हाही एक उपक्रम मात्र नंतर बरेच वर्ष मी केल्याचं मला चांगलंच आठवतंय . 

आजोबा गेल्यावरही आजीसोबत ह्यातल्या बऱ्याच गोष्टी दर दिवाळीच्या सुटीत होत असत पण ती मजा पुन्हा कधीच आली नाही . नंतर नंतर अभ्यास वाढत गेला अन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात ही सुटी संपू लागली पण त्यात एक वेगळी मजा  होती ज्ञान मिळवण्याची अन यश संपादन करण्याची .
पण ह्या साऱ्यात एक अत्यंत समान धागा होता ज्यात माझा बराचसा वेळ व्यतीत होई  तो म्हणजे "दिवाळी अंक " किमान दहा अंकांचे वाचन झाल्याशिवाय समाधानच होत नसे. मग ते अगदी चंपक किशोर पासून ते मोठ्यांच्या मासिकातील त्या वयात वाचण्याजोग्या कथा अन मुलाखती असोत . पुढे पुढे गाडी चांदोबा वगैरेंवरून एकदम पत्रिका , छात्र प्रबोधन यांवर येउन थांबली. पण ह्या अंकांनी जणू व्यक्तिमत्व घडणीत फार मोठा मोलाचा वाटा  उचलला . समाज म्हणजे काय ह्याचे भान हळूहळू ह्यातून येत गेले. माणसांच्या चित्रविचित्र स्वभावाचे निदान theoretically ज्ञान होत गेले .दिवाळी अंकांची चाहूल मला पार कोजागिरी पासून लागत असे. कोणताही अंक माझ्याशिवाय कोणी उघडायचा नाही ह्या एका कारणावरूनच काय तो हट्ट - चिडचिड आणि रडणं होत असे. दिवाळी म्हणजे दिवाळी अंक हे जवळ जवळ bijective Function जणू ! 

हळू हळू मोठी होत गेले तसा आता वर्षभर खात असलेल्या चिवडा - लाडू चकलीचे दिवाळीपुरते पूर्वी असलेले महत्व कमी झाल्याने, घरातल्या अनेक मधुमेहींमुळे एकूणच गोड मिठाई आणि इतर पदार्थ खाण्यातला कमी झालेला उत्साह , वर्षानुवर्षे पाहिलेली दादरची खरेदीची गर्दी आणि आधीच गरज भागेल इतके असलेले कपडे ह्यांमुळे नवीन कपडे वगरे बद्दल असलेली अनास्था , कुटुंबीयांनी एकत्रित भेटण्यासाठी नसलेला वेळ आणि मुंबईत होणाऱ्या प्रचंड प्रदूषणामुळे होणारी चिडचिड … एकूणच ह्या अनेक घटकांमुळेच दीपावली साजरी करण्यात फोलपणा आहे असेच काहीसे वाटू लागले . घरी तसेही कोणत्याच सणाचे प्रस्थ - पूजा - अर्चांचे अवडंबर नव्हतेच . कदाचित त्यामुळेच मी मनातून ह्या  दिखाऊ साजऱ्या उत्सवापासून कायमच दूर दूर जात राहिले .

गेली तीन वर्षे मात्र इथे वेगळ्याच विश्वात असल्याने दिवाळीचातसा विशेष गंधही नाहीये. नवीन कपडे घालणे अन केवळ आपली संस्कृती , पूजा - अर्चा … अशा दृष्टीकोनातून मी कोणत्याच सणाकडे अन विशेषत: दिवाळीकडे आजतागायत पहिले नसल्यामुळेच  असेल कदाचित पण राहिलेला अभ्यास संपवण्यासाठी मिळालेली एक बोनस सुटी अशी माझी मानसिकता झालीये . फारतर आंतरजालावर प्रसिद्ध होणारऱ्या दिवाळी अंकाचे वाचन एवढाच माझा काय तो दिवाळीशी संबंध . 
आम्ही सगळीच भावंडं वेगवेगळ्या शहरांत आणि आपापल्या कामात व्यग्र आहोत . आणि . . आता आजीही नाही :( आम्हाला सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवणारा हा महत्वाचा दुवाच निखळलाय. यंदापासून तिची दरवर्षी होणारी भाऊबीजही आता ह्यापुढे नसेल . माझी दृष्ट काढायला ते सुरकुतलेले मऊ हात नसतील अन् मुख्य म्हणजे मी पुढच्या सुटीत घरी जाईपर्यंत माझ्यासाठी खुणा करून ठेवलेल्या दिवाळी अंकातले लेख नसतील . छात्र प्रबोधनच्या अंकाला कुणीच स्पर्श केलेला नसेल . आई - बाबा देखील बहुदा कार्यालयातून मिळालेली ही सुटी इतर कामे करण्यासाठीच वापरत असतील.

खरंतर सगळी मजाच जणू निघून गेलीये आता दिवाळीतली. इथे सगळ्या मैत्रिणी sweets , new dresses , पूजा , lamps अश्या चर्चा करत असताना त्यात सहभागी व्हायची अजिबात इच्छा नाहीये . त्यात एकाच समाधान म्हणजे आज एक नवीन दिवाळी अंक वाचायला मिळाला . अक्षरश : झपाट्याने वाचून काढला अन् वाटले हीच माझी यंदाची दीपावली . 


गेले ते दिन गेले म्हणत त्या जुन्या आठवणीत रमायचे अन् पुढील अभ्यासासाठी सज्ज व्हायचे यासाठी घेतलेला एक थांबाच जणू …

- Sam

ऑक्टोबर २३ , २०१४
लक्ष्मीपूजन

रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

पूर्णविराम : एका वेगळ्या प्रवासाला

१४ सप्टेंबर २०१३
अचानक संध्याकाळी एक धक्का बसला . एक जबाबदारी अंगावर पडली !  हे सगळा इतकं अनपेक्षित होतं की तेव्हा कसलाच विचार केला नव्हता . डोक्यात विचारचक्रे सुरु झाली होती पण ; पुढे काय होणार आहे हे तेव्हा कळणार तरी कसे होते ! त्या वेळी  आधीच इतक्या गोष्टीत मी गुंतलेले होते की एक चेंलेंज स्वीकारावं तसा काहीसं डोक्यात नोंदले गेले ते क्षण ! 



१४ सप्टेंबर २०१४
 खरंतर ज्या क्षणी मी हे उतरवत आहे त्याच सुमारास हे घडलं . आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालंय .

सुरुवातीला वाटणारी नसती कटकट नंतर खरंच आनंद देऊन गेली . कधी चेंलेंज म्हणून तर कधी मजा म्हणून जे जे जमेल ते करत गेले .
सगळ्यांपेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असूनसुद्धा माझ्यावर कोणीतरी विश्वास टाकला होता माझ्यापरीने मी तो सार्थ ठरवलाय. भल्यासाठी  जितकं जमेल तितकं केलंय . चुका माफ नक्कीच होतील

अनेकांना सोबत घेऊन काहीतरी यशस्वी करणं हे सोपं नसतं  विशेषत : मुलींना , ह्याची जाणीव ह्या प्रवासात झाली .
अनेक हात सोबतीला  पण तोंडं चार दिशांना अश्या परिस्थितीत खंबीरपणे मार्ग कसा काढायचा हेही ह्यानिमित्ताने उमगलं. प्रवाहाविरुद्ध पोहताना अनेक अडचणी असल्या तरीही त्यात एक वेगळी मजाही असते हे समजलंय .
कधी चुकले , कुठे अडखळले. कधी एकटीनेच मार्ग काढला तर कधी कोणाच्या सोबतीने . मार्गदर्शन करायला अनेकांची साथ अन् भरभक्कम पाठींबा वेळोवेळी होताच . त्याशिवाय हे निभावणं शक्यही झालं नसतं .

 एका जबाबदारीतून मुक्त झाले . दिवस - रात्र एक करून , जेवण विसरून करावे लागणारे कामही नसेल . उरल्यात त्या फक्त गेल्या वर्षभरातल्या  कडू - गोड आठवणी . निरोपाचे दु:ख निश्चितच नाही . पण जोडला  गेलेला  मित्रपरिवार  दुरावेल ह्याचे वाईट नक्कीच वाटतंय .

अशी हि अनुभवांची शिदोरी घेऊन आता पुढे वाटचाल करणार आहे .

अगदी मुक्तपणे .. . .

- संपदा



रविवार, १० ऑगस्ट, २०१४

३ राख्यांची गंमत

आज रक्षाबंधन !
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत नियमितपणे साजरा केला जाणारा एक सण !

आषाढीनंतर शाळेला असणारी बहुदा पहिलीच सुटी ,खरंतर या सणापासून जे सुट्यांचे सत्र सुरु होई ते बहुदा दिवाळीनंतरच संपत असे म्हणून खासच अप्रूप होते मला ह्या सणाचे !
केवळ बहिणीनेच भावाला राखी बांधायची हे काही मला कधीच पटले नाही. माझ्या आवडीच्या राख्या घ्यायच्या / तयार करायच्या आणि त्या बांधणार मात्र माझे दोन बंधुराज ही संकल्पनाच मला सहन होत नसे अन् म्हणूनच मी नेहेमीच ३ राख्या घेत असे . दोन दादांना बांधत असे अन शेवटची एक त्यांच्याकडून बांधून घेई ! अगदी दुसऱ्या दिवशी  शाळेत जाताना देखील बऱ्याचदा मी ती राखी काढत नसे .
गेली काही वर्षे आम्ही तिघे तीन वेगवेगळ्या शहरात राहत आहोत त्यामुळे प्रत्यक्ष रक्षाबंधन काही होत नाही . केवळ मेलद्वारे राखीची इमेज पाठवली आज अन मग अचानक तीन राख्यांची गंमत आठवली आणि मेल पाठवताना स्वत:लाच CC करायला हवा होता का असा विचार करत बसले  :D



- Sam

( राखी आंतरजालावरून साभार )

सोमवार, ७ जुलै, २०१४

काही क्षण . . . १ ( Wimbledon Final 2014 )

काल बऱ्याच वर्षांनी अशी ठाण मांडून वगैरे टेनिसची match बघितली . अप्रतिम झाली . फेडरर हरला ह्याचे दु:ख आहेच परंतु तो काही वर्षांपूर्वी बहरत असताना जसा खेळायचा तसाच अगदी पुन्हा बघायला मिळाला .

गंमत म्हणजे बाबांसोबत laptop समोर ६.३० पासून ते रात्री १०. ३० पर्यंत असं पसरून बसलेलं असताना आईने एकदाही हटकलं नाही किंवा माझ्या आरोळ्या आणि आरडा-ओरडा ऐकून रागावली नाही त्यामुळे तर ह्या सगळ्याची मजा अजूनच वाढली  : ) 

अप्रतिम सर्विसेस ,सर्व - वॉली , विचार करून केलेले अप्रतिम प्लेसिंग्स , पासिंग शॉट्स , रंगलेल्या rallies , फेडीने वाचवलेले match points , सामना ४ थ्या सेटमध्ये न गमावता शेवटपर्यंत दिलेली झुंज !! अहाहा !
असे सामने इतक्या सहजी बघायला मिळत नाहीत .

फेडरर हरला त्याचे खूप वाईट वाटले पण ज्या जिद्दीने त्याने पुढच्या वर्षी इथे येईन हे म्हटले ते पाहून वाटले हा मनुष्य wimbledon जिंकल्याशिवाय काही निवृत्ती घेत नाही ! सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे हा रडूबाई काल रडला नाही, कदाचित सध्या तो जिंकण्या हरण्यापेक्षाही आनंदासाठी खेळतोय हेच त्याला दाखवून द्यायचे असेल . तो हरला हे पाहून मलाच खरतर प्रचंड वाईट वाटलं होतं तिथे त्या बिचार्याचे काय झाले असेल ! Better luck next time dear Federer !

( इंटरनेटवरून साभार )

सहसा घरी असताना रविवारी संध्याकाळी सी- फेसला जाणं मी कधीच चुकवत नाही पण काल मी गेले नाही ह्याचं अजिबात दु:ख नाही याउलट अप्रतिम सामना बाबांसोबत running commentary ( खरंतर चीत्कारणे )  करत पाहताना खूप मज्जा आली .

Thanks Federer and Djokovick for the great match !

शनिवार, ७ जून, २०१४

आठवणीच्या चिंध्या


काल दुकानात प्रिंटआउट काढण्यासाठी गेले होते . तेव्हा माझ्या  job च्या कागदांच्या ह्या चिंध्या दिसल्या अन् जूने दिवस आठवले ! तिथल्या मुलाने हा सारा कचरा फेकून द्यायच्या आत मी जवळजवळ तिथून हिसकावून घेतला आणि माझ्या पिशवीत कोंबला . माझा सहकारी माझ्याकडे बघतच राहिला पण त्याला काहीच कळणार नव्हते माझ्या मनात त्या क्षणी काय चालू होते ते !


माझे मन जवळजवळ १५ वर्षे मागे गेले . म्हणजेच मी तेव्हा साधारण ३ - ४ वर्षांची असेन. बाबांच्या ऑफिसात जायचं ह्याचं खूपच अप्रूप असे तेव्हा . दरवर्षीचा दसरा  वगळता एखादी वारी होई माझी तेथे . पण तिथे गेल्यावर अश्याच कागदाच्या चिंध्यांचा डोंगर दिसत असे . त्यावर जाऊन उड्या मारणे , त्यातल्या वेगवेगळ्या आकाराच्या चिंध्यांचे मासे तयार करणे आणि अनेक चिंध्या सोबत घरी घेऊन येणे हे माझे आवडते उद्योग !
बाईंडर काका देखील अगदी प्रेमाने मला हे सारे करू देत . कधी कधी मग प्रिंटर काका मला एखाद्या कागदांच्या उंच गठ्ठ्यावर बसवत . मग सगळ्या प्रेस मध्ये काय चाललं आहे हे तिथून मला दिसे . त्या छपाई यंत्राचा तो एका लयीतला कागद उचलताना होणारा आवाज आणि मग हळूच सरकत जाऊन शुभ्र अंगावर रंगीत नक्षी लेवून खाली पडणारा तो कागद ! खूपच अचंबा वाटायचा मला साऱ्याचा . मशीनही अजस्त्र वाटत असे . दसऱ्याच्या दिवशी सजलेली यंत्रे अन् हत्यारे , रंगाचे डबे , cutting machine त्याच्या वेगवेगळ्या blades ह्याची सारे कामगार अगदी मनोभावे पूजा करत . त्या दिवशी साधा कागदाचा तुकडाही पवित्र वाटत असे !

पुढे जशी वर्षे गेली तसा प्रेससुद्धा घराजवळ आला अन मग मी बऱ्याचदा इंटरनेट साठी किंवा सहजच तिथे जात असे. आर कधी यंत्र चालू नसेल तर ती शांतताही त्रासदायक वाटत असे इतका त्या यंत्राचा आवाज परिचित आणि आपलासा वाटत असे मला !

हळूहळू बाबांचे बोलणे ऐकून मीदेखील हे यंत्र कसा चालतं हे समजू लागले होते . ढगाळ वातावरणात कागदावर चुण पडू नये म्हणून छपाई करत नाहीत , दोर्याने शिवलेली पुस्तके गमिंग केलेल्या पुस्तकांपेक्षा अधिक काळ टिकतात , कागद हळुवार उचलावा अन्यथा त्याच्या कडांनी हाताला चिरा जातात , कागद कापताना खाली पुठ्ठा ठेवावा असे अर्धवट ज्ञान मलाही झाले ! गमिंग आणि पेस्टिंग कसा करतात , एखाद्या वस्तूला / वही - पुस्तकाला व्यवस्थित कव्हर कसे घालावे हे जणू तज्ञ व्यक्तीकडून शिकायला मिळाले . अगदी साधी छपाई करताना देखील कागद कसा वाचवावा ह्याचेही बाळकडू मला मिळाले . ह्या सगळ्या गोष्टी शिकताना एक मात्र झाले खूपच मोठ्या प्रमाणात सतत कागद बघितल्याने कदाचित मी त्याच्या काटकसरी वापराबाबत प्रचंड बेफिकीर झाले आहे .

हे सारे असले तरीही मला नेहेमी वाटत असे की ह्या सार्या informal शिक्षणाचा मला उपयोग तो काय ! पण गेल्या साधारण वर्षभरात ह्या माझ्या गृहितकाला धक्काच बसला . pravega साठीचे प्रिंटींग जास्तीत जास्त चांगले करताना , scipher साठीचे packing करताना, कागद भरभर कापताना किंवा अनेक गठ्ठे उचलून नेताना , बक्षिसे wrap करताना जेव्हा मी भरभर ही  कामे इतरांपेक्षा दुप्पट वेगाने अक्षरश: उरकते तेव्हा मला जाणवतं की केवळ आणि केवळ बाबा अन् graphitec मुळेच आणि बाबांकडून मिळालेल्या अनौपचारिक ज्ञानामुळे हे मला जमू शकतंय . ह्या साऱ्याबद्दल मी कायमच त्यांची आभारी असेन .

खरंतर छपाई केवळ माझे बाबाच नाहीत तर आई अन् आजीने देखील ( indirectly आजोबा सुद्धा ) एक उद्योग - धंदा म्हणून कोणत्या न कोणत्या प्रकारे अन् त्यांच्या जीवनात एकदातरी केली आहे . म्हणूनच मी ह्या क्षेत्राशी सध्या थेट संबंधित नसले तरीही मलाही आयुष्यात कधी न कधी छपाई संदर्भात काहीतरी करायला नक्कीच आवडेल .

कित्येक वर्षे झाली सतत धावणाऱ्या त्या यंत्राचा आवाज शेवटचा ऐकून !
रंगांच्या डब्याचा अन् केरोसिनचा तो सुवास आजही मनात दरवळतो आहे .
रोलर पुसण्यासाठी लागणाऱ्या कापडाच्या चिंध्या माझ्या खोलीत आपण कधीतरी वापरले जाऊ म्हणून आजही वाट बघत आहेत !
कागद / चित्रे कापून चिकटवताना मागे उरणाऱ्या चिंध्या कचऱ्यात जाण्याआधी टेबलावर अनेक दिवस रेंगाळणे नेहेमीचेच आहे .
काल मला मिळालेला हा चिंध्यांचा गुंता अनेक दिवस माझ्याकडेच मुक्काम करणार आहे . ह्या जुन्या रम्य विश्वाची सफर सतत घडवून आणणार आहे
परंतु
 आता  ह्या आठवणीच्या चिंध्या पुन्हा जोडून एकसंध चित्र तयार करून त्या दुनियेत प्रत्यक्षात जाता येणार नाही हे सत्य अस्वस्थ करत राहणार आहे .

 - Sam

मंगळवार, २७ मे, २०१४

बुद्धीचे 'बळ' !


Just played a Chess game with my aai ! I had nothing in front except a paper and a pen but she had a board in front. Surprisingly I managed to go till the end - game and she resigned as I had 2 pawns extra !!

I played such a game almost after many years. This game was some 3o odd moves and I was happy at the end for keeping my clean record against her.

When i was a kid and was learning, my sir used to show me some game and he used to ask me to repeat it entirely. I also had played a few blind-fold games with my baba but I had hardly succeeded to achieve some reasonable position. But this was few years back !
Good old memories !

Going to have fun recalling all that while going to bed.

Felt like sharing that game so here it is !
 ( Indirectly its getting preserved else possibly I would have lost  that sheet  )
White : My mother 
Black : Me 


I know I made many mistakes in this game but I really enjoyed it and thus felt like sharing it here !

बुद्धिबळाने मला खूप काही शिकवलंय ! अगदी विचार कसा आणि किती करावा पासून ते खेळातील राजकारणापर्यंत सारे काही. लहानपणी मी खूप  खेळले.  खेळण्यातली मजा अनुभवत होते पण ; अश्याच एका क्षणी मी स्पर्धात्मक खेळणं सोडून दिलं पण तरीही ह्या खेळाबद्दलचं प्रेम आणि आकर्षण कधीच तसूभरही कमी झाले नाही !

आज पुन्हा तो निखळ 'आनंद' अनेक दिवसांनी अनुभवला.
 काही महिन्यातच आनंद आपल्याला पुन्हा आनंद देईल अन जगज्जेता होईल हीच  आशा


- Sam
(  बरेच काही आहे मनात परंतु कागदावर उतरवण्यासाठी सध्या वेळ नाही तूर्त इतकेच ) 

रविवार, २० एप्रिल, २०१४

माझा (?) मतदारसंघ !

मी बंगलोरमध्ये असताना १८ वर्षांची झाले अन इथे लगेचच विधानसभेची निवडणूक होती त्यामुळे सध्याचा माझा मतदारसंघ आहे "मल्लेश्वरम - बेंगळूरू उत्तर " पण तरीही माझा खरा मतदारसंघ -  जुना दक्षिण मध्य मुंबई म्हणजेच २००९ च्या फेररचनेनंतरचा नवीन दक्षिण मुंबई शहर हा मतदारसंघ !

येत्या २४ तारखेला येथे  मतदान होणार आहे . हा मतदारसंघ (जेंव्हा दक्षिण मध्य मुंबई होता तेव्हा ) गिरणगावाचा समावेश असल्यामुळे आणि मनसे तेव्हा स्थापन झालेली नसल्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे . मोहन रावले ह्यांचा हा परंपरागत मतदारसंघ होता परंतु २००९ साली झालेली पुनर्रचना आणि मनसेने बाळा नांदगावकर ह्यांना दिलेली उमेदवारी ह्यांमुळे मतविभागणी होऊन मिलिंद देवरा ह्यांचा विजय सुकर झाला . मिलिंद देवरा ह्यांच्यासाठी ही  निवडणूक चुरशीची होती परंतु मतविभागणीमुळे विजय अक्षरश: सोपा झाला होता . इतर मतदारसंघांप्रमाणेच इथेही मनसे + शिवसेना > कॉंग्रेस हेच चित्र होतं . यंदाच्य आप पक्षाच्य उमेदवार मीरा सन्याल ह्या स्वतंत्र उमेदवार म्हणून उभ्या होत्या अन त्यानाही १० हजाराच्या आसपास मते मिळाली होती .

यंदाची परिस्थिती पाहता अन मीरा सन्याल ह्यांना गेल्या वेळी मिळालेली मते पाहता निवडणूक तिरंगी न होता चौरंगी होईल असा अंदाज आहे . मनसे - शिवसेना हि विभागणी अपरिहार्य आहे . त्यातच मोहन रावले ह्यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर chameleon प्रमाणे शिवसेना - राष्ट्रवादी - शिवसेना असे पक्षाबद्दल केवळ काही आठवड्यांच्या कालावधीत केल्याने त्य्नाच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडालेला असणे स्वाभाविकच आहे .
अरविंद सावंत - बाळा नांदगावकर  ।।  मिलिंद देवरा - मीरा सन्याल
अशी मतविभागणी होण्याची शक्यता खूपच जास्त आहे .
ह्या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो . ह्याकडे जरा अधिक पाहूया

१ . वरळी : 
विद्यमान आमदार : सचिन अहिर
पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस
ह्या मतदारसंघावर  ( अर्थातच हा माझा विधानसभा मतदारसंघ आहे ! ) दत्ताजी नलावडे ह्यांची अनेक वर्षे पकड होती . वरळी कोळीवाडा हा शिवसेनेला  कायम मदतीचा हात देणारा विभाग ह्याशिवाय वरळी नाका अन् त्यापलीकडील पूर्वेकडच्या भागातही सेना - मनसेचे प्राबल्य . परंतु नलावडे ह्यांनी घेतलेली निवृत्ती , अहिरांची प्रचंड आर्थिक क्षमता , राजकीय दादागिरी अन पवारांशी जवळीक ह्यामुळे येथे प्रचंड धुमश्चक्री प्रचारादरम्यान पाहायला मिळाली होती . ह्याशिवाय सेना - मनसे मतफ़ुटी होतीच !  येथील मते ह्या  पक्षांत विभागली जातील असा माझा अंदाज आहे . येथील
नगरसेवकांचा जनसंपर्क अफाट आहे अन् त्यामुळेच येथे त्यांचा प्रभाव अन प्रचाराची तीव्रता निर्णायक ठरेल .

२. शिवडी :
विद्यमान आमदार :बाळा नांदगावकर
पक्ष : मनसे
गेल्या वेळी येथे तेव्हाचे आमदार दगडू सकपाळ  ह्यांना  बाळा नांदगावकर ह्यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभूत केले होते . ह्यात प्रामुख्याने गिरणगावात सेना - राज ह्यांच्या झालेली मतविभागणी आणि दोन्ही उमेदवारांचा जनसंपर्क ह्या कारणांचा समावेश होता . यंदा ह्या मतविभागणीला अन् राज ह्यांच्या दिशाहीन प्रचाराला कंटाळल्याने अन मोदींच्या प्रभावामुळे महायुतीकडे मतदार  शकतो परंतु खुद्द नांदगावकरांना मिळालेले तिकीट ह्यामुळे समीकरणे पार बदलू शकतात ,


३. भायखळा 
विद्यमान आमदार :मधुकर चव्हाण
पक्ष :  कॉंग्रेस
ह्या भागात बहुदा भेंडीबाजार , भायखळा आणि इतर पूर्वकडील भागांचा समावेश होत असावा ( मला माहिती मिळाली नाही भौगोलिक दृष्ट्या माझा अंदाज बरोबर असावा ) त्यामुळेच सारी अमराठी मते देवरांना मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे .


४. मलबार हिल 
विद्यमान आमदार :मंगलप्रभात लोढा
पक्ष :भाजप
तब्बल वीस वर्षे येथे विद्यमान आमदार निवडून येत आहेत. बाबुलनाथ परिसर तसेच इतर गुजराती बहुल वस्ती , जयवंतीबेन मेहता ह्यांनी तसेच लोढांनी केलेली कामे जनसंपर्क ह्यामुळे हा भाग भाजपची हमखास विजय मिळवून देणारी जाग. त्यातच मोदिलातेमुळे सगळा गुजराती मतदार महायुतीला मत देणार हे जवळपास निश्चित ! ह्याशिवायाही येथे  आहे त्यामुळेच मनसेमुळे मतविभागणी झाली नाही तर अरविंद सावंत ह्यांना येथून चांगलीच आघाडी मिळू शकते .

५. मुंबादेवी 
विद्यमान आमदार :अमीन पटेल
पक्ष :  कॉंग्रेस
येथे देखील मलबार हिल्प्रमाणे  मतदार आणि मूळचे स्थानिक मुंबईकर ( पाठारे - प्रभू ) ( ह्यांची इथे बरीच property आहे असे ऐकिवात आहे ! ) राज पुरोहित ह्यांचा जनसंपर्क ह्यामुळे भाजपचे प्राबल्य आहे परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मनसे - शिवसेना मतविभागणीचा महायुतीला चांगलाच फटका बसला होत. यंदा ही मते पुन:च महायुतीकडे एकवटली जाऊ शकतात ( सारे काही मोदी effect वर अवलंबून )


६. कुलाबा 
विद्यमान आमदार :शेखर Annie
पक्ष : कॉंग्रेस 
ह्या मतदारसंघात कुलाबा कोळीवाडा अन नेव्हीनगर हे भाग सोडले तर बहुतांश विभाग हा गर्भश्रीमंतांच्या रहिवासाचा आहे . अन हा भाग पूर्वीपासूनच मुरली देवरांच्या परंपरागत मतदारसंघात येत असल्याने कॉंग्रेसची हक्काची मते येथे आहेत .


ह्यासगळ्यात आता 'आप' चा विचार करूया ! मीरा सन्याल ह्यांचे नाय ह्याआधीही मतदारांनी मतदानयंत्रावर पाहिले आहे . आपचा प्रभाव तसा उच्च मध्यमवर्गीय अन् श्रीमंत मतदारांवरच राहील असा अंदाज आहे ह्याचे मुख्य कारण म्हणजेच गिरणगावातील सारी मंडळी बाळासाहेबांना दैवत मानणारी आहेत . जरीही मनसेला मते दिली तरीही त्यांची सेना ( मग ती शिवसेना असो व म. नवनिर्माण !) निष्ठा ढळत नाही !
सन्याल ह्या कॉंग्रेसची मते खेचू शकतात . त्याबाबतीत देवरांना गाफील राहून चालणार नाही . वरळी सी फेस , परळ मधील उच्चभ्रू वस्ती ( ज्याला status symbol वाटावा म्हणून अप्पर वरळी म्हटले जाते जे खरे वरळी नव्हेच ! ) मलबार हिल खंबाला हिल येथील अगुजराथि मतदार , कुलाबा अन मरीन drive परिसर येथे ही आप -  कॉंग्रेस मतविभागणी देवरांना तापदायक ठरू शकते . इतर मराठी बहुल सेनानिष्ठ भागात आप केवळ तरुण मतेच मिळवू शकेल असे सकृतदर्शनी वाटत आहे .

त्यामुळेच येथे चुरशीची चौरंगी लढत पाहायला मिळणार हे निश्चित !
विजय कोणाचा होईल हे सांगणे कठीण असले तर जर आपचा ताप झाला नाही तर देवरांना कोणी हरवू शकेल असे वाटत नाही परंतु कोणत्या विभागात किती टक्के मतदान होईल अन ते कोणत्या वयोगटाचे अन धर्माचे ह्यावर सारी समीकरणे अवलंबून असतील !

पाहूया काय होते आहे ते !

I voted. Will you ?
"Use your right...Cast your vote to bring change" 
Let us build our nation.


- sam

सोमवार, ७ एप्रिल, २०१४

रणसंग्राम

आज ७ एप्रिल २०१४.जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस ! ह्याच दिवशी  म्हणजे आजच १६व्या लोकसभेसाठीच्या मतदानाची देशाच्या एक कोपऱ्यात असलेल्या मतदारसंघापासून सुरुवात झालीये . अनेक अर्थांनी ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण  आहे ! त्याचा  थोडक्यात आढावा.

नवीन पिढी : तरुण मतदार

ह्या वर्षी माझ्या पिढीतले म्हणजेच  शतकाच्या शेवटच्या दशकात ज्यांचा जन्म झाला असे सगळे आम्ही लोकसभेसाठी प्रथमच करणार आहोत .
२०१३ साली जर वय १८ वर्षे असेल तर जन्म २०१४ - १८ = १९९५  त्याधीचा हवा .  निवडणूक गेली काही वर्षे दर पाच वर्षांनी होत असल्यामुळे १९९० - ९५ मध्ये जन्मलेल्या सगळ्याच नवमातदारांची पहिली मोठी निवडणूक !

आम्ही इंदिरा - राजीव हा कालखंड केवळ इतिहास - नागरिकशास्त्रात / वृत्तपत्रात वाचलाय . जेव्हा आम्हाला समजू लागलं होतं तेव्हा अटलजींच्या सरकारचे शेवटचे काही महिने राहिले होते . अन मग त्यांनतर UPA ची राजवट !
 सुरुवातीची काही वर्षे सुरळीत गेल्यानंतर अमेरिका - भारत संबंधांमुळे रशियासोबतचे आपले जुने नाते ताणले गेले होते तो एक विचित्र कालावधी होता . त्याच वेळी १२३ मुळे  सरकार अस्थिर झाले होते . अनेक छोट्या पक्षांचा बाहेरून आणि ( बाहेरून नाही म्हणजेच आतून असा माझा समज अन त्याला आर्थिक जोड असावी असा माझा दात संशय ! ) आतून दिलेला पाठींबा . चिदम्बरम ह्यांच्या १९९० सालाप्रमाणे राबवलेल्या आर्थिक सुधारणा ह्यामुळे जरी जनता ह्या सरकारच्या विर्रोधात असली तरीही पुन्हा २००९ साली ( कदाचित शीर सरकार असावे ह्यामुळे असेल अथवा घराणेशाही अन 'गांधी' हे नाव ह्यामुळे असेल ) UPA ला बहुमत मिळून सरकार स्थापन झाले .

 परंतु गेल्या ५ वर्षात जे काही झाले आहे त्याबाबत हि नवीन पिढी twitter, facebook ह्या सगळ्या माध्यमांद्वारे आपली मते परखडपणे मांडताना दिसलीह्या पिढीला अनेकांनी ऐकवला कि तुम्ही मोठ्या संख्येने मतदान केले पाहिजे त्यामुळेच यंदा हा वर्ग मत देईल अन कडची जुन्या गृहितकांना धक्का पोहोचेल अशी काही जाणकारांची अटकळ आहे!
ह्या पिढीचेही प्रामुख्याने दोन गट  पडतात

अ. शहरी तरुण : ( here its assumed that this literacy and basic education are subsets of this category ! )
हाच तो गट जो सार्वजनिक संपर्क माध्यमात मोठ्या संख्येने टीका टिप्पण्या करतो . काहीसा संभ्रमित असा हा मतदार. नक्की कोणाला पाठींबा द्यावा ह्याचा निर्णय नेमका कसा घ्यावा ह्याचा उलगडा ह्यांना अजून झालेला नाही . स्थिर सरकारची गरज कळते आहे पण राजकारणी आश्वासने कधीच पूर्ण करत नाहीत अन् सगळे एकाच माळेचे मणी मग करावे काय हा यक्षप्रश्न आहे !

ब . ग्रामीण तरुण :  शेतीत भविष्य नाही अन् शिक्षणासाठी पैसा नाही ह्या कात्रीत सापडलेला हा गट ( ह्यांच्या मानसिकतेची मला विशेष माहिती नाहीये ! )
   
नवीन पक्ष : आप

राजकारण्यांच्या खोटारड्या वृत्तीला , भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या अन म्हणूनच सरकार विरोधात असलेल्या असंतोषाला अण्णा हजारेंच्या आंदोलनाने मोकळी वात करून दिली . अनेक जन भारावून गेले अंड त्यांनी त्या चळवळीला पाठींबा दिला . त्यातले काही मनापासून चळवळीत सामील होते अन त्यांना ह्या लढ्याची कल्पना होती त्यांचा ह्या  होत तर काही केवळ एक  अन वेगळं काही (  thirll ) म्हणून सामील झाले होते . ह्यातूनच अरविंद केजरीवाल ह्यांच्या डोक्यात एक सुपीक कल्पना उदयाला आली अन आम  पार्टी ह्या पक्षाची स्थापना झाली . केवळ anti - incumbency, नव्याची नवलाई   अन् अण्णांच्या आंदोलनातून निर्माण झालेली  जागरुकता ह्यामुळेच ह्या पक्षाला दिल्लीत अभूतपूर्व यश मिळाले .
यशाची हवा डोक्यात गेल्याने असेल वा अतिअत्मविश्वास , ह्या पक्षाने हि निवडणूक लढवायचे  ठरवले .प्रसारमाध्यमांनी सुरुवातील डोक्यावर घेतल्याने आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असं काहीसं अरविंद केजारीवालांना वाटू लागलं अन प्रचारसभांमध्ये त्यांचं ताळतंत्र सुटलं .
अनेकांच्या मनातून हा पक्ष सध्या उतरलेला आहे .
केवळ प्रसिद्धीचा हव्यास असलेला एक गात अशी काहीशी प्रतिमा निवडणूक सुरु होतानाचा ह्यांच्याबद्दल  निर्माण होत आहे . अन हे ह्या पक्षासाठी नक्कीच घातक असेल .

व्यक्तिकेंद्री भाजप

ह्या पक्षाबद्दल नेमकं काही सांगता येईल असा नाही पण पूर्वीच्या निवडणुकांमध्ये 'लोकशाही पद्धत ' असलेला पक्ष अशी जी ओळख होती ती आता धुसर होऊ लागली आहे . ' केवळ आणि केवळ मोदी ' असेच काहीसे वेगळेच चित्र यंदा आहे . अरुण जेटली प्रथमच निवडणूक लढवत आहेत . ह्या पक्षाच्या एखाद्या नेतुअने ह्याआधी कधी दोन जागा लाधावाल्याचे माझ्या ऐकिवात नाहीये परंतु विरोधी बाकांवर बसून कंटाळलेले नेते , मोदी लाटेचा फायदा न उठवतील तरच आश्चर्य ! बाकी  ह्यांच्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच !

राहुल बाळ अन कॉंग्रेस

ह्यांना गेल्या पाच वर्षातला सावळा गोंधळ विसरायला नक्कीच आवडेल म्हणूनच घराणेशाहीवर अन पूर्व पुण्याईवर प्रचार चालू आहे असेच वाटते . राहुल ह्यांची  घेतल्यावर असलेली हि पहिलीच मोठी निवडणूक . नुकत्याच झालेल्या विधानसभेत भाजपने चारलेली धूळ , आप चा उदय अन् दिशाहीनता ह्यामुळेच सगळ्याच पातळ्यांवर वैचारिक गोंधळ उडालेला हा पक्ष नीती यशस्वी होतो ह्यावर कदाचित ह्यांचे भविष्य अवलंबून असेल !

इतर काही बाही

लोकसभा निवडणुकीत लहान पक्षांचे काम मोठ्या पक्षांना हानी पोहोचवण्याचे असते . त्यात के किती यशस्वी होतात हे कळेलच .
सीमाभागात तसेच नक्षलग्रस्त भागांत हि निवडणूक सुरळीत पार पडणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच मतदानाचा टक्काही यंदा वाढायला हवा आहे . निवडणूक आयोग प्रचंड मेहेनत घेऊन हे काम चोखपणे पार पाडत असतो त्यामुळेच आचारसंहितेचा भंग होणार नाही ह्याची आपण साऱ्यांनीच काळजी घ्यायला हवी .


मतदानाचा हक्क बजावून आपण ह्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी खारीचा वाटा उचलुया .

- sam

PS: अजून  बऱ्याच गोष्टी आहेत पण ते लिहिण्यासाठी वेळ नाहीये त्यामुळे पुन्हा कधीतरी :) 

रविवार, २३ मार्च, २०१४

संवाद साधताना . . .

लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत यावर्षी सई परांजपेंची 'सय' अशी लेखमालिका येत आहे . मला आजपर्यंतचे बरेचसे लेख आवडले . विचार करायला प्रवृत्त करणारे वाटले आजचाही लेख त्याला अपवाद नव्हताच !
आजच्या लेखात त्यांनी सामान्य फ्रेंच माणूस कसा आत्मविश्वासाने बोलतो आणि आपण आपल्याच मातृभाषेत संवाद साधताना कसे अडखळतो ह्याबद्दल  थोडे लिहिले आहे. त्यावरूनच माझे विचारचक्र सुरु झाले .

किती खरं आहे हे ! म्हणजे मला फ्रेंच नागरिकांबद्दल माहित नाही पण आपल्याबद्दल जे काही म्हटलंय ते अगदी खरय असं  वाटतं .  अगदी माझंच उदाहरण घेतलं तर कितीही शिकवलं गेलं असलं तरीही मी माझे विचार चारचौघात स्पष्टपणे न अडखळता नेहेमीच मांडू शकते असा मला वाटत नाही . अगदी वाईट परिस्थिती नसली तरीदेखील एक 'वक्ता' म्हणून मी स्वत:बाबत नाहीच . असं का व्हावं ?

'वक्ता दशसहस्त्रेषु ।' असा म्हटलं जातं ते अगदी १००% खरं आहे . सध्या निवडणुकांचा काळ आहे आणि  दूरदर्शन वाहिन्यांवर अनेक मुलाखती होत असतात . अनेक निवेदक त्यांच्या भावना अन् त्यांचे प्रश्नच थेट सहभागी वक्त्यांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत . काय हे दुर्दैव ! अजूनही आठवतंय पूर्वी सह्याद्रीच्या ९च्या बातम्या खास निवेदन कसे करावे अन् मुलाखत कशी घ्यावी हे शिकण्यासाठी मला दाखवल्या जायच्या . प्रदीप भिडे, शैलेश दातार , स्नेहा आघारकर वासंती वर्तक ह्यांच्यासारखे कसलेले निवेदक असत १० वर्षांपूर्वी ! खूप शिकायला मिळत असे त्यातून . केवळ दहा मिनिटांच्या त्या मुलाखतीत नेमके प्रश्न कसे विचारावेत अन छोटी परंतु आशयपूर्ण उत्तरे कशी द्यावीत हे साडेनऊच्या बातम्यांमधूनच शिकावं !

अडखळण्यामागाची कारणमीमांसा केली तर सुसूत्र विचार नसणं , ठाम मतांचा अभाव आणि भाषेवरचं कमी झालेलं प्रभुत्व हे प्रामुख्याने जाणवतं . सुसूत्र विचारधारेसाठी , ठाम मतांसाठी लागणारे चौफेर वाचन सध्या खूपच कमी झालंय. इंटरनेटच्या प्रभावामुळे एका ठराविक पद्धतीचे वाचन खूप जास्त होत असेलही पण त्यात म्हणावे तितके वैविध्य नाही . संदर्भ शोधण्यासाठी पुस्तके / ग्रंथ चाळणे अन् आपल्याला जे हवं आहे ते सोडून भलत्याच विषयाची माहिती आपोआप मिळणं हे गुगल सर्चमुळे बहुदा विसरलं गेलंय .अत्यंत गतिमान युगात व्याख्यानमालेला जाऊन भाषणे ऐकणं  संस्कृती हळूहळू नष्ट होत चालली आहे . मित्रमैत्रिणीबरोबर केलेल्या चर्चा - वादविवाद ह्यातूनच अनेकदा  माहिती ( data )  मिळत असे अन त्यातूनच अनेकविध निष्कर्ष ( data analysis ) काढून ठाम मते तयार होत . सध्या वेळेच्या अभावी हे सारं खूपच कमी झालंय .

भाषा अन् त्यावरचं प्रभुत्व हा एक स्वतंत्रपणे चर्चिण्याची गोष्ट ! काही दिवसांपूर्वीच एका दादाशी चर्चा करताना लक्षात आले कि गेल्या कित्येक दिवसांत शुद्ध मराठीत कोणाशीच संवाद साधला नाहीये ! नेहेमीच संवादात  इंग्रजी अथवा हिंदी शब्दांची पेरणी अभावितपणे केली जाते . मग आम्ही ठरवल्यावर थोड्या प्रयत्नांनी आम्हाला विशेष कष्ट न घेत सहज संवाद साधने जमलेदेखील . त्यातूनच लक्षात आले ,भाषेचा गोडवा जपणाऱ्या अन् काही वर्षांपूर्वी रोजच्या बोली भाषेतही वापरल्या जाणाऱ्या कित्येक शब्दांचा आम्हाला विसर पडला होता जणू ! खरंतर एखाद्या भाषेत संवाद साधताना केवळ आणि केवळ त्याच भाषेत बोलणं हेच योग्य आहे असं मला वाटतं . मग ते मराठी असो , इंग्रजी असो व इतर कोणतीही भाषा . आमच्या नाट्यशास्त्राच्या शिक्षकांनी भारतीयांच्या इंग्रजी बोलाण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकला होता . जर भाषेवर विशेष कष्ट घेतले नसतील तर आपल्या इंग्रजी संभाषणातून आपली मातृभाषा बर्याचदा डोकावते . हे केवळ मराठी मातृभाषा असलेल्यांचेच नाही तर सर्वसाधारण भारतीय प्रवृत्ती ( सवय खरंतर ) आहे !
सोपं उदाहरण म्हणजे  नकळतच म्हणतो : It is a huuuuuuuge Auditorium ! ( इट इझ अ ह्यूSSSज ऑडीटोरिअम ) आपल्या भावनाप्रधान भाषेमुळेच असं होतं . प्रत्यक्षा इंग्रजीत असा विशेषणांना विशेष महत्वाच  नाहीये !
तसंच केवळ त्याच भाषेत संवाद साधल्याने आपल्या विचारात सुसूत्रता येतेच त्याचबरोबर आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवणं खूप सोपा जातं अन आपला आत्मविश्वासही त्यातून दिसून येतो .

ह्याउलट मला बरंच काही शिकवून गेलेला अनुभव म्हणजेच आकाशवाणीवरच्या मुलाखती अन् वाचन ! आपल्या नेहेमीच्या बोलण्याला बर्याचदा सवयीमुळे एक विशेष गती आलेली असते परंतु रेडिओवर वाचन करताना आपण आपले हावभाव लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही म्हणूनच सावकाश बोलण्याला विशेष महत्व असतं . माझाच कार्यक्रम नंतर पुन्हा ऐकताना लक्षात आलं कि मी इतकं वेगात बोलले होते कि कदाचित ऐकणार्यांपर्यंत ते पोहोचलंच नसावं . तसाच नियम निबंध वाचनाला . भाषेत वैविध्य असावा म्हणून दोन साधी वाक्ये जोडताना आपण ' आणि ' 'अन्' आणि ' व ' चा तितकाच वापर करतो परंतु बोली भाषे आपण 'अन्' जास्त वापरतो आणि 'व ' वापरताच नाही !
माझं रेकॉर्डिंग होईपर्यंत अन माझ्या हे निदर्शनास आणून दिलं गेलं तोपर्यंत मी असा  विचार केलाच नव्हता !

 ह्यातूनच लक्षात आला संवादाच्या प्रत्येक माध्यमाचे . भाषेचे काही नियम हे उपयुक्तता आणि सोय ह्यातून निर्माण झालेले असतात ते पाळणं हे एक बंधन नसलं तरीही मेंदूच्या एका कोपर्यात त्याची नोंद करून घेणं अन योग्य वेळी वापर करायचा प्रयत्न करणं हे आपण नक्कीच करू शकतो .

शेवटी भाषा हे एक माध्यम आहे म्हणूनच ती कोणतीही असो श्रोत्याच्या  घेऊन न अडखळता अस्खलित संवाद साधणं हेच महत्वाचं !

- संपदा
  २३ / ०३ / २०१४ 

(  लेख लिहून झाल्यावर लक्षात आलंय की  मांडणी खूपच तुटक झालीये , नेमकेपणा तर मुळीच नाहीये आणि शुद्धलेखन दूरची गोष्ट  ; पण कदाचित लिहून लिहूनच सरावाने हे  साधता येईल हि छोटीशी  आशा त्यामागे आहेच :)  )

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

Pravega Pravega Pravega !!!

निरोपाची वेळ कधीच येऊ नये असं वाटतं . पण ती टाळणं शक्यच नसतं . आज तो दिवस आलाच .
अखेर मला आमूलाग्र बदलवणाऱ्या अनुभव समृद्ध करणाऱ्या अन … अश्या pravega'१४ ला निरोप देताना अक्षरश: आज डोळे भरून आले आहेत .

ही team ह्यापुढे नसेल ,  अन दिवस - रात्र एक करून , जेवण विसरून करावे लागणारे कामही नसेल . उरल्यात त्या फक्त गेल्या अठरा महिन्यातल्या कडू - गोड आठवणी. ह्याचा शेवट इतका गोड होईल असा स्वप्नातही वाटला नव्हतं . मी अजूनही स्वत:ला पुन्हा पुन्हा विचारते आहे , काल झालेली हि मीटिंग खरच होती का ते केवळ एक गोड स्वप्न होतं ?    कितीही चुका झाल्या तरीही माझ्यामते  It was a successful show !
( कितीही झालं तरी पैशाचं सोंग उभं करता येत नाही हेच खरं ! )
एका डोळ्यात निरोपाचं दुख : अन दुसऱ्यात विजयाचा , मोहीम पूर्ण झाल्याचा आनंद आहे .
Pravega  आम्ही तुझं  बारसं केलं तुला एक मूर्त स्वरूप दिलं . पण त्याहीपेक्षा   तू मला खूप काही दिलं  आहेस. मी तुझी कायमच ऋणी राहीन .शून्यातून  विश्व निर्माण करण्याचं भाग्य फार थोड्यांना लाभता आणि त्यात मी होते म्हणूनच हे सारं शक्य झालंय तू यापुढे नेहेमीच असशील पण तरीही First Impression is the Last Impression म्हणूनच पहिल्या pravega च्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात कायमच टिकून राहतील .

Pravega !! I love you !  You have taught me so much that i have learnt much more in those 18 months than what i might have learnt in 18 years without anyone actually teaching me !
I hope you grow bigger and better.
Looking forward to see you in my life from a completely different perspective.
Trying to be with you but not a part of you !
Trying to go away from you but not being able to !
Bye Bye Pravega'14 and at the same time Welcome pravega'15 !


- Sampada C. Kolhatkar
  Core committee
  Pravega'14
  IISc Bangalore
  www.pravega.org

( कदाचित शेवटची सही असेल हि ! core committee म्हणून ! )


Thank you all who helped in making Pravega a huge success !! 


Core team pravega
Much relaxed on a bright sunny day in Summer 2013
( Milind , Suhas , Pranav , me , Aditya , Krishnan, Himani )
      P           R            A         V        E               G           A             

रविवार, १२ जानेवारी, २०१४

दृष्टीकोन


नव्या वर्षाची सुरुवात तशी जर घाई-गडबडीतच झाली . कामांची गर्दी , नवे कोर्सेस , ताप देणारे time-table  आणि सकाळी ८ वाजताची ( म्हणजे खरंतर पहाट ती ! ) lectures यामुळे खूपच धावपळ चालू होती .

त्यातच अनेक गोष्टी घडल्या अन मला "दृष्टीकोन" ह्या शब्दाची पुन्हा नव्याने ओळख झाली . निमित्त झालं ते म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते प्रा . वेंकी रामकृष्णन ह्यांच्याशी संवाद आणि "Theoretical and Mathematical Ecology " हा कोर्स !!

३ जानेवारीला आमच्या UG department ने प्रा. रामकृष्णन ह्यांच्यासोबत एक संवाद सत्र आयोजित केले होते . त्यांचे आजपर्यंतचे करिअर म्हणजे एक आश्चर्यच आहे कारण त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात भौतिकशास्त्राचा अभ्यास केला . पुढे जाऊन त्यातच PhD मिळवली अन नंतर सैद्धांतिक भौतिकशास्त्राऐवजी जीवशास्त्रात संशोधन करण्यासाठी पुनश्च Grad school मध्ये जाऊन २ वर्ष त्याचा मुळापासून अभ्यास केला . Ribosomes वर पुढे अनेक वर्ष संशोधन केले अन नोबेल पारितोषिक मात्र रसायनशास्त्राचे मिळाले !
खऱ्या अर्थाने interdisciplinary आहे हे सारे !

ह्या चर्चासत्रात आम्ही ह्या संदर्भात अन इतरही अनेक प्रश्न विचारले तेव्हा माझं लक्ष्य त्यांच्या विधानाने वेधून घेतलं ते म्हणजे
" Physicists work with simple models and when you start doing something in Biology you need to change your perspective of a physicicst to tackle biological models and complex systems !! "

खरंतर तोपर्यंत मी perspective अर्थातच "दृष्टिकोनाचा" अशा अर्थाने ,गंभीरपणे विचारच केला नव्हता.
आणखी एक निमित्त म्हणजे Ecology चा कोर्स !
हा कोर्स वेगवेगळे विषय major असलेली मंडळी करत आहेत . काहीजण PhD students आहेत तर बाकीचे आम्ही UG ! त्यातही गणित , biology आणि फिजिक्स अश्या तीन शाखांचं प्रतिनिधित्व आहे .
सुरुवातीला एक मॉडेल घेऊन मग ते सोपे करत गेलो आणि त्याचे गणितीय समीकरण मांडले. अन् त्या समीकरणाचे विविध पैलू आम्ही गेल्या दोन दिवसांत अभ्यासले.
समीकरण तसं साधं आणि सोपं

 मी ह्या समीकरणाचा एक quadratic equation म्हणूनच विचार करत होते . पण मग जेव्हा काहीजणांनी ह्या समीकरणाचा ecological अर्थ significance ह्या संदर्भात चर्चा सुरु केली तेव्हा लक्षात आले , एकाच गोष्टीचा आपण अनेक दृष्टीकोनातून विचार करू शकतो.
 हे निव्वळ गणिती समीकरण नाही तर एखाद्या प्रदेशात population नेमकं कसं बदलतं अन् ते कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतं अशी सारी नैसर्गिक माहिती ते देत आहे !
जर मी त्या सामिकारानाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून कधी पाहिलंच नसतं तर मला हे सौंदर्य कधी समजलंच नसतं .

यापुढे समोर येणाऱ्या विविध गोष्टींचा अनेक अंगांनी विचार अन् एखादी वरवर साधी सोपी दिसणारी गोष्टं , अनेक दृष्टीकोनातून सविस्तर समजून घ्यायला हवी .



 अशीच एक गंमत :

Lord Buddha told  "Be in the world but don’t be part of it !! "
Limit points told the same thing to mathematicians
So,
Now we have a claim : "The sequence of limit points converge to Buddha !! "
:D :D
Its meaningful and can be either true or false so It is a statement !!!
What a logic !!
Is Lord Buddha's sayings a map from Mathematics to life ?
Mathematics is awesome !!
I love maths !
( Source : Math lecture and our comments )




टीप :