शनिवार, ६ जून, २०१५

पुस्तके : एक भेट

माझ्या शाळेत दरवर्षी बक्षिसे म्हणून पुस्तकांसाठी ठराविक रकमेची कुपने दिली जात. मग आई त्यात आणखीन भर घालून एखादे चांगले पुस्तक विकत घेई. पुढे पुढे शाळेने पुस्तकेच बक्षीस म्हणून देणं सुरु केलं. लहान असल्यापासूनच घरात खेळणी आणि कपड्यांच्या एकत्र संख्येपेक्षा जास्त पुस्तके घरात असलेली मी पाहिली आहेत. त्यामुळेच एखाद्याला भेट द्यायची तर ती पुस्तकांचीच असंच माझं कायम मत होतं नुकताच ह्या गृहितकाला मोठा धक्का बसला.

माझी एक सीनिअर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या संस्थेत जाणार असल्याने तिला काहीतरी पुस्तक भेट द्यावे असे मनात होते. नुकताच मी एका पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला. मला प्रचंड आवडलेलं हे पुस्तक एका महिला शास्त्रज्ञाबद्दल असल्याने त्याचा इंग्रजी अनुवाद (मूळ फ्रेंच आहे ) तिला भेट म्हणून द्यावा असं माझ्या मनात होतं.

आम्ही सगळेच soft copy वर जगणारी मंडळी त्यामुळे ह्या पुस्तकाची soft copy असेल असं वाटतंच होतं आणि मला ते नको होतं. मला बऱ्याचश्या अनधिकृत वेबसाईट्सवर काही ते सापडलं नाही म्हणून मी आनंदाने ते amazon वरून kindle copy स्वरूपात भेट कसे द्यायचे ह्यावर साधारण एक तासभर शोध घेतला , तिची kindle copy चालेल ना वगैरे विचारून परवानगी घेतली आणि किंमत शुक्ती करण्याआधी पुन्हा एकदा soft copy चे अस्तित्व चेक करायला गेले आणि …….
.
.
.
.

जे मला ३ तास खर्च करून सापडले नव्हते ते अर्ध्या तासात मिळाले.

माझी शंका खरी ठरली म्हणून आनंद मानायचा की हल्ली soft कॉपीज मुळे पुस्तके भेट म्हणून देता येत नाहीत ह्याचे दु:ख व्यक्त करायचे ??

( खरंतर soft कॉपीज वापरून प्रताधिकार कायद्याचा भंग होणं आणि लेखकाला रॉयल्टी न मिळणं असे अनेक गंभीर मुद्दे असले तरी त्याबाबत पुन्हा कधीतरी . सध्यातरी पुस्तक भेट देत येणार नाही याचं दु:खच जास्त ! )

शुक्रवार, २२ मे, २०१५

काहीच्या काही . . उगाचच (३)

संपदा
sam (हे उच्चारायच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत )
samee
sampu
saampoo
संप्या
छोटा टारझन
अध्यक्ष बाई
Little monkey
Spy
NSA
Maxx Genius (patented by Krishnan and can be used only by Himani & Krishnan*  ) 

Kid from Happy Family 

Kolha (आईगं ! चुकून एका पत्रावर आडनाव अर्धवट छापलं गेलं होतं तर kolha म्हणे ! )

चंद्रशेखर ('आडनाव नाव वडिलांचे नाव' ह्या पद्धतीमुळे काहीही  भन्नाट combinations करतात ! ) 

अजून काय काय नावे असणारेत ह्यापुढे माझी …

Note : *हे माझे IISc मधली सिनिअर आहेत 

मंगळवार, ५ मे, २०१५

आता निरोप हा घ्यावा …

वाटलं नव्हतं कधी
इतक्या लवकर हा दिवस उजाडेल
कटू सत्याला सामोरे जात
भावनांना बांध घालावा लागेल

आत्ताच झाली होती भेट जणू
counselling नुकतेच संपलेले
१ ऑगस्टच्या त्या दिवशी
orientation मध्ये भेटलेले

महिन्याभरातच सुरु झाली
फेस्ट प्रवेगाची तयारी
नव्या ओळखी नवे विषय
यशस्वी करण्या एक विज्ञान वारी

बघता बघता दिवस लोटले
तयार झाली core कमिटी
सिनिअर जुनिअर झालो सारे एक
भिंत केव्हाच पडली होती

कामांचे डोंगर उपसताना
मैत्रीची मुळे खोलवर रुजत गेली
तयार झाले एक कुटुंब
नाव त्याचे एकच : IISc UG

त्यांना नव्हते कधीच कुणी
पुढे  दाखवायला मार्ग
पण स्वतः खोदलेल्या रस्त्यावर
आमच्यासाठी ते झाले दीपस्तंभ
UG Batch 2015 and 2016
This is what we share !
This is how we were !
Will miss you lots
my Dear seniors !

कुठचीही अडचण येवो
केवळ एक फोन करावा
किंवा एका हाकेवर
जवळचा senior धावून यावा

कित्ती मज्जा कित्ती मस्ती
treats आणि ट्रिप्स
quarks , pravega scipher
सदैव तत्पर UG team

 सुख दु:खे विनोद चिडचिड
यश - अपयश अन् gosips
काय केलं नाही आम्ही एकत्र ?
खरंचअसे काही आठवतही नाही

अखेर उजाडला  तो
एप्रिल ३० चा दिवस
खूप पुढे निघून गेले
आमचे सगळे seniors

कोणी इथे तर कोणी तिथे
प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या
होईल का कधी पुन्हा
अशी एकत्र भेट ?

कटू सत्य असे हे
आता स्वीकारायला हवे खरे
पण झुलत आठवांच्या हिंदोळ्यावर
नयनांतून अश्रू ओघळे

दाटून येई कंठ
काही सुचेना आता
परि पुन:श्च भेटण्याच्या आशेवर
आता निरोप हा घ्यावा
आता निरोप हा घ्यावा
आता निरोप हा घ्यावा … 





- Sampada
( Your Little Monkey / Sammy / Sampo / Sam )


सोमवार, २० एप्रिल, २०१५

विद्यार्थी'दशा'

आदर्शवादी आणि एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यासारखं वागण्याचे संस्कारांची मुले आपल्यात किती घट्ट रुजलेली असतात नाही !
कधीतरी एखादी assignment उशिरा दिलेली चालते,
एखाद- दुसरं lecture बुडवलेलं चालतं
कधीतरी आळशी TA च्या assignments  मध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर ने देताही पूर्ण मार्क मिळू शकणार असतील तर वेळेअभावी ते चालू शकतं .
थोडासा ढिसाळपणा चालतो
दुसऱ्याच्या assignments ची उत्तरे copy केलेली चालू शकतात


नाही झेपत कधी कधी
खूप त्रास होतो स्वत:ला समजावताना

बहुदा विद्यार्थी'दशा' असेल तर हे अनुभवावं एकदातरी :P

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

काहीच्या काही . . उगाचच (२)

एक जाहिरात : 

कामाचे स्वरूप : प्रश्न क्रमांक द्या उत्तरे छापून मिळतील .
किमान कालावधी : ३ दिवस
कमाल कालावधी : ७ दिवस
एका वेळी ५ जॉब स्वीकारले जातील .
specialists in : LaTeX मध्ये उत्तरे typset करून मिळतील
                          सुबक / सुंदर अक्षरात हस्तलिखित हवे असेल तर तेही मिळेल
यंत्र  : ऑफसेट(?)  प्रिंटींग ( ४ color machine ) ( Red Green Black Blue Add Gel ink )
पत्ता : इथेच संपर्क साधा …

किंमत : ३ क्रेडीट Course मधले १० - २० मार्क

आपली विनम्र ,
कामाच्या प्रतीक्षेत (बाबांची मुलगी )

छापखाना झालाय माझा !

(G+ वरची पोस्ट वाहून जाऊ नये म्हणून इथे चिकटवली )

गुरुवार, १९ मार्च, २०१५

काहीच्या काही . . उगाचच (१)

 एक होता बैल . वर्षातले आठ महिने घाण्याला जुंपलेला …
त्याचे काम एकच …
झोपेच्या खोबऱ्यातून assignments ची उत्तरे काढणे …


शनिवार, २४ जानेवारी, २०१५

Humanities UH 302 : शासनाची ओळख

नव्या वर्षासोबतच नवे सेमिस्टर सुरु झाले. नवे कोर्सेस , वेगळे विषय , नवे वेळापत्रक ह्या सगळ्याशी जुळवून घेतानाच  जवळ जवळ ९- १० महिने ज्याची अत्यंत आतुरतेने वाट बघितली होती तो म्हणजेच आमचा शेवटचा humanities चा कोर्स सुरु झाला . अगदी course format वाचला तेव्हाच खात्री पटली होती आणि पहिल्या लेक्चर मध्ये बऱ्याच अपेक्षांची पूर्ती होईल असे संकेत मिळाले . अगदी वेगळा अनुभव , अनेकविध विषय अन् तेही आपल्या रोजच्या वाचनातले ! त्यामुळेच वेगवेगळ्या लेक्चर्स मध्ये मिळालेली माहिती , त्यात आम्ही केलेली चर्चा  , त्याच विषयाशी संबंधीत अश्या एका वेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांच्या गटाने केलेल्या वाचन , संशोधनाचे सादरीकरण ह्याचा गोषवारा इथे मांडवा असं मला वाटतंय . जशी lectures होतील तसं त्याच लिहिण्याचा प्रयत्न करेन . बघूया कितपत जमतंय . खरतर इंग्रजीत झालेल्या चर्चा मराठीत आणि  माझ्या भाषेत मांडणं हेच बहुतेक सगळ्यात कठीण असेल . English मध्ये लिहिणं खरंच खूप सोपं गेलं  असतं पण अश्या प्रकारचे विषय एकत्रित मराठीत कुठे मांडले गेलेले माझ्या सहज वाचनात आले नाहीत म्हणूनच ही उठाठेव !

===================================================
मानवशास्त्र म्हणजेच Humanities चा कोर्स आम्हाला प्रत्येक सत्रात असतो त्यातला शेवटचा केवळ एका क्रेडिटचा सेमिनार कोर्स म्हणजेच UH 302 : Introduction to governance म्हणजेच ' शासनाची ओळख ' !
अगदी नावाप्रमाणेच ह्या कोर्सच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या शासनयंत्रणांची ओळख - माहिती आणि त्यासोबत त्या यंत्रणेशी संबधित एखाद्या संवेदनशील / महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थी गटाने केलेले प्रेझेंटेशन असे एका सत्राचे स्वरूप असेल . आत्तापर्यंत २ सत्र झाली आणि मुख्य म्हणजे जेवणाची वेळ उलटून गेली तरी -  रात्रीचे साडे आठ वाजून गेले तरी आणि मुख्य म्हणजे जवळपास तीन तास चर्चा - परिसंवाद होऊनही ५० % उपस्थिती शेवटपर्यंत होती  हे नक्कीच आश्चर्यकारक ( प्राध्यापकांसाठी :P ) होतं . 




प्रध्यापाकांबद्दल थोडेसे :
Prof . Uday Balakrishnan हे १९७५ च्या batch चे भारतीय टपाल सेवेतील एक निवृत्त अधिकारी ! राज्यशास्त्रात उच्चशिक्षण घेतलेल्या उदय यांनी भारत सरकारच्या अनेकविध महत्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे आणि त्या अनुषंगाने देशाचा बराचसा ग्रामीण भागही पिंजून काढला आहे . ह्या सेवेच्याच कालावधीत शासनातर्फे त्यांची नेमणूक IISc मध्ये ५ - ७ वर्षे registrar म्हणून झाली होती . सध्या  ते एक लेखक , CCS -  IISc मध्ये मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत असून कोचीन येथील एका कला संग्रहालयाचे सल्लागार देखील आहेत .


===================================================


Lecture ०१ : १० जानेवारी २०१५

खरंतर त्या दिवशी मुख्यत्वे आमचे गट पाडणं , विषय निवडणं आणि लेक्चरच्या वेळा ठरवणं ह्यातच बराचसा वेळ गेला परंतु नेमकं काय काय शिकायला मिळेल ह्याची थोडीफार चर्चाही झाली.

भारत  : एक लोकशाही संघराज्य 
वय : जेमतेम ७० वर्षे
लोकसंख्या केवळ अफाट !
अनेक तापदायक शेजारी !
मुक्त अर्थव्यवस्था : १९९१ पासून प्रयत्न


कृषिप्रधान अर्थव्यवस्था
आणि  ……
आपण अजून स्वतंत्र  आहोत  - लोकशाही कशी असावी एक उत्तम उदाहरण . आज आपल्याला ( अजूनतरी ) कोणीतरी लष्करी अधिकारी अचानक उठाव करून देश ताब्यात घेईल ह्याची तितकीशी भीती नाही खरंतर  असा विचार आपण कधीच करत नाही !
 कितीही संकटे आली तरीही एक देश म्हणून आपण एकत्र येतो . खरंतर वाकेन पण मोडू देणार नाही अश्या लवचिक मानसिकतेतून आजवर आलेल्या अनेक अंतर्गत राजकीय - सामाजिक - नैसर्गिक उठावांना आपण यशस्वीपणे तोंड दिले.
इंग्रजांनी जिथे सोडले तिथूनच आपण प्रगतीला सुरुवात केली ! आज आपण त्या प्रगतीच्या - उत्कर्ष साधण्याच्या मार्गावर असलेल्या एका वळणावर उभे आहोत . कदाचित पुढच्या विकासासाठी आपल्याला आजची परिस्थिती बदलायची नितांत गरज असेलही पण हा केवळ एक टप्पा आहे आणि १९४७ च्या मानाने आणि तत्कालीन आर्थिक परिस्थिती , लगोलग झालेली युद्धे  , आणीबाणी ह्या सर्वांना तोंड देऊन आपण एक देश म्हणून जी प्रगती साधली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे !

आगदी जुने* संदर्भ चाळले तर अनेक अमेरिकन आणि युरोपीय राजकीय अभ्यासकांनी दक्षिण आशियाला वाचवायचा असेल तेथील परिस्थिती सुधारावयाची असेल तर भारताचा बळी  लागेल अशी अभ्यासपूर्ण विधाने केली होती त्यापार्श्वभूमीवर आपण एक लोकशाही सार्वभौम संघराज्य म्हणून ( अलिप्ततावाद सांभाळून ) जे काही साधले आहे ते तितकेही वाईट नाहीच म्हणून ह्यापुढे वेगवेगळे विषय चर्चेस घेऊन त्यासंदर्भात आजवर काय झाले आणि कोणत्या सुधारणा करता येतील / पुढची विकासाची दिशा काय आहे हे समजून घेऊया .





*१९५० पूर्वी आणि त्यासुमारास काहीवेळा १९६५ नंतरही