Mathematics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mathematics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

आधुनिक भारतीय गणित देवता

१९५८ चा तो काळ ! दुसऱ्या महायुद्धाच्या जखमा घेऊनच जपान इतर क्षेत्रांप्रमाणेच विज्ञानातही पुन्हा भरारी घेण्याचा प्रयत्न करत होता. अमेरिकेनेही त्या काळात जपानमध्ये काही पुनर्वसन उपक्रम राबवले होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रा. अन्द्रे वेइल सारखे काही विख्यात अमेरिकन गणितज्ञ जपानच्या दौऱ्यावर गेले होते. ह्या दौऱ्यात काही तरुण हुशार जपानी गणिताच्या विद्यार्थ्यांना ह्या गानिताज्ञांसोबत चर्चा करायची संधी मिळाली.मुलाचं गणितातलं ज्ञान पाहून आंद्रेईनी त्यातल्या १०-१५ मुलांना सोबत अमेरिकेत येण्याचं आमंत्रण दिलं. आणि अश्या प्रकारे जपानी अमेरिकन गणितज्ञांची पहिली पिढी अमेरिकेत स्थिरावली.
प्रा. केन ओनो हे दुसऱ्या पिढीतले जपानी- अमेरिकन गणितज्ञ म्हणजेच प्रा. ताकाशी ओनो ह्या गणितज्ञांचे चिरंजीव.
तो काळही अमेरिकेतल्या जपानी मंडळींसाठी विशेषत: केनसारख्या तरुणांसाठी संघर्षाचा होता. पर्ल हार्बर अनेक अमेरिकन्स विसरलेले नव्हते. घरात जपानी शिस्तीचे कडक वातावरण आणि बाहेरच्या अमेरिकन संस्कृतीचे आकर्षण. केनने १६व्या वर्षी शिक्षण सोडून देऊन वडिलांविरोधात बंड पुकारले. त्याच सुमारास एक केनसाठी एक अनपेक्षित घटना घडली. एका सकाळी एस. जानकी अम्मल ह्या बाईंचे पत्र ताकाशी ओनोंसाठी आले. ते पत्र पाहताच प्रा. ताकाशींनी मनोभावे नमस्कार केला अन् अत्यंत भावपूर्ण होऊन केनला एक गोष्ट सांगितली. आणि ती होती प्रख्यात भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन ह्यांची !
आणि ते पत्र होते रामानुजन ह्यांच्या पत्नीचे !
१९८५ मध्ये जगभरातील ( मुख्यत्वे अमेरिका आणि UK ) गणितज्ञांनी रामानुजन ह्यांचा ब्राँझचा अर्धपुतळा तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन वर्गणी गोळा केली होती त्यासाठी आभार मानणारे पत्र होते ते.
केनच्या वडिलांना, पहिल्या महायुद्धाच्या प्रतिकूल काळात रामानुजननी इंग्लंडमध्ये राहून संशोधन चालू ठेवण्यासाठी दिलेला लढा हा अमेरिकेत टिकून राहण्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला होता.
आणि त्याक्षणापासून केनला रामानुजन उलगडत गेले, समजत गेले आणि आज केन त्यांना देव मानतो !
इतकंच नव्हे तर स्वत:च्या गणितातल्या संशोधनाव्यतिरिक्त केननी मद्रास विद्यापीठात जाऊन स्वत: रामानुजनच्या वह्या अभ्यासल्या. त्यांच्या केम्ब्रिजमधल्या कामाची हस्तलिखिते, कागदपत्रे अभ्यासली आणि नुकतंच त्याच्या विद्यार्थिनीने आजपर्यंत दुर्लक्षिला गेलेला एक रामानुजन ह्यांचा सिद्धांत त्या कागदपत्रांमधून शोधून काढला !
---------------------------------------------------------------------------------
श्रीनिवास रामानुजन ऐयंगार, आधुनिक युगातले प्रख्यात भारतीय गणितज्ञ ! ( the most celebrated indian mathematician of २०th century )
आज २२ डिसेंबर ही त्यांची जयंती. हा दिवस २०१२ पासून भारतात ' राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा केला जातो.
Srini ramanujan_0.jpg
---------------------------------------------------------------------------------
रामानुजन ह्यांच्या गणितकार्याविषयी मी विशेष लिहिणार नाही कारण विकिपीडियावर बर्यापैकी सोप्या भाषेत लिहिलेलं आहेच आणि चर्चेच्या अनुषंगाने येइलच.
रामानुजन ह्यांनी केलेल्या संशोधनाला पुढे नेउन अनेक नवीन वाटा गणितात निर्माण झाल्या. अनेक शास्त्रज्ञांना अत्यंत प्रतिष्ठेची ' फिल्ड्स' पदकं मिळाली. आजही रामानुजन ह्यांचं कार्य एक मैलाचा दगड मानलं जातं.
---------------------------------------------------------------------------------
Robert Kanigel ह्यांनी The Man Who Knew Infinity हे श्रीनिवास रामानुजन ह्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक लिहिलं. आता ह्याच पुस्तकावर आधारित Matthew Brown दिग्दर्शित चित्रपट येतो आहे. ह्या चित्रपटातला गणिताचा भाग प्रा. केन ओनो आणि प्रा. मंजुळ भार्गव ह्यांनी लिहिला आहे त्याशिवाय इतरही बरीच मदत केली आहे. त्यामुळेच हे दोन सध्याचे आघाडीचे गणितज्ञ ह्या हॉलीवूडपटाचे को- प्रोडुसर झाले आहेत !
चित्रपट : The Man Who Knew Infinity
------------------------------------------------------------------------------
नुकतंच प्रा. केनचं रामानुजन ह्यांच्या आयुष्यावर, गणितसंशोधनावर ICTS मध्ये व्याख्यान झालं त्यात ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळाला आणि म्हणूनच त्याचा सारांश, गणिताचा भाग वगळून इथे द्यायचा प्रयत्न केला आहे.

रविवार, १२ जानेवारी, २०१४

दृष्टीकोन


नव्या वर्षाची सुरुवात तशी जर घाई-गडबडीतच झाली . कामांची गर्दी , नवे कोर्सेस , ताप देणारे time-table  आणि सकाळी ८ वाजताची ( म्हणजे खरंतर पहाट ती ! ) lectures यामुळे खूपच धावपळ चालू होती .

त्यातच अनेक गोष्टी घडल्या अन मला "दृष्टीकोन" ह्या शब्दाची पुन्हा नव्याने ओळख झाली . निमित्त झालं ते म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते प्रा . वेंकी रामकृष्णन ह्यांच्याशी संवाद आणि "Theoretical and Mathematical Ecology " हा कोर्स !!

३ जानेवारीला आमच्या UG department ने प्रा. रामकृष्णन ह्यांच्यासोबत एक संवाद सत्र आयोजित केले होते . त्यांचे आजपर्यंतचे करिअर म्हणजे एक आश्चर्यच आहे कारण त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात भौतिकशास्त्राचा अभ्यास केला . पुढे जाऊन त्यातच PhD मिळवली अन नंतर सैद्धांतिक भौतिकशास्त्राऐवजी जीवशास्त्रात संशोधन करण्यासाठी पुनश्च Grad school मध्ये जाऊन २ वर्ष त्याचा मुळापासून अभ्यास केला . Ribosomes वर पुढे अनेक वर्ष संशोधन केले अन नोबेल पारितोषिक मात्र रसायनशास्त्राचे मिळाले !
खऱ्या अर्थाने interdisciplinary आहे हे सारे !

ह्या चर्चासत्रात आम्ही ह्या संदर्भात अन इतरही अनेक प्रश्न विचारले तेव्हा माझं लक्ष्य त्यांच्या विधानाने वेधून घेतलं ते म्हणजे
" Physicists work with simple models and when you start doing something in Biology you need to change your perspective of a physicicst to tackle biological models and complex systems !! "

खरंतर तोपर्यंत मी perspective अर्थातच "दृष्टिकोनाचा" अशा अर्थाने ,गंभीरपणे विचारच केला नव्हता.
आणखी एक निमित्त म्हणजे Ecology चा कोर्स !
हा कोर्स वेगवेगळे विषय major असलेली मंडळी करत आहेत . काहीजण PhD students आहेत तर बाकीचे आम्ही UG ! त्यातही गणित , biology आणि फिजिक्स अश्या तीन शाखांचं प्रतिनिधित्व आहे .
सुरुवातीला एक मॉडेल घेऊन मग ते सोपे करत गेलो आणि त्याचे गणितीय समीकरण मांडले. अन् त्या समीकरणाचे विविध पैलू आम्ही गेल्या दोन दिवसांत अभ्यासले.
समीकरण तसं साधं आणि सोपं

 मी ह्या समीकरणाचा एक quadratic equation म्हणूनच विचार करत होते . पण मग जेव्हा काहीजणांनी ह्या समीकरणाचा ecological अर्थ significance ह्या संदर्भात चर्चा सुरु केली तेव्हा लक्षात आले , एकाच गोष्टीचा आपण अनेक दृष्टीकोनातून विचार करू शकतो.
 हे निव्वळ गणिती समीकरण नाही तर एखाद्या प्रदेशात population नेमकं कसं बदलतं अन् ते कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतं अशी सारी नैसर्गिक माहिती ते देत आहे !
जर मी त्या सामिकारानाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून कधी पाहिलंच नसतं तर मला हे सौंदर्य कधी समजलंच नसतं .

यापुढे समोर येणाऱ्या विविध गोष्टींचा अनेक अंगांनी विचार अन् एखादी वरवर साधी सोपी दिसणारी गोष्टं , अनेक दृष्टीकोनातून सविस्तर समजून घ्यायला हवी .



 अशीच एक गंमत :

Lord Buddha told  "Be in the world but don’t be part of it !! "
Limit points told the same thing to mathematicians
So,
Now we have a claim : "The sequence of limit points converge to Buddha !! "
:D :D
Its meaningful and can be either true or false so It is a statement !!!
What a logic !!
Is Lord Buddha's sayings a map from Mathematics to life ?
Mathematics is awesome !!
I love maths !
( Source : Math lecture and our comments )




टीप :