आता " बाळांनो ,।" अशी प्रेमळ हाक मारणारे कोणी नसेल !
बालदिन अन वार्षिक बक्षीस समारंभाची ती शान नसेल .
इंग्रजीत अस्खलित संभाषण केल्यावर पाठीवर पडणारी थाप नसेल .
अन सुयश संपादन केल्यावर कौतूकासाठीचा फोन नसेल । बालदिन अन वार्षिक बक्षीस समारंभाची ती शान नसेल .
इंग्रजीत अस्खलित संभाषण केल्यावर पाठीवर पडणारी थाप नसेल .
बालमोहनचा एक आधारवड आता उन्मळून पडलाय …
शाळा हि कधी शाळा वाटलीच नाही मला दुसरे घरच होते ते !
कोणत्याही स्पर्धेला जाताना तुमचे आशीर्वाद आत्मविश्वास वाढवायचे .
यश मिळाल्यावर होणारे कौतुक पाहून आनंदाश्रू वाहू लागायचे
शाळेसाठी थोडेफार जे करता आले त्याचे समाधान आहेच . काही
गोष्टी राहून गेल्या खऱ्या पण शाळेने केलेले संस्कार , लावलेले वळण अन
समाजात वावरण्यासाठी उपयुक्त असे ' जगण्याचे ' धडे हि पुंजी अशीच मनात जपून
ठेवली जाईल.
शाळेचे
नाव असेच उज्ज्वल करून बालमोहनची पताका अशीच फडकवत ठेवणे हीच खरी आदरांजली
ठरेल अन 'बालमोहन'चे एक बाळ म्हणून मी यासाठी नेहेमीच कटीबद्ध राहीन .
- एक बाळ
संपदा
बालमोहन विद्यामंदीर १९९८ - २०१०२५/११/२०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा